राज्यमंत्री भरणे औकातीत राहून शब्द वापरा, हिंमत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवा... File Photo
महाराष्ट्र

राज्यमंत्री भरणे औकातीत राहून शब्द वापरा, हिंमत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवा...

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर कार्यक्रमात 1 कोटींचा निधी देण्यावरून "मुख्यमंत्र्यांच जाऊद्या मरू द्या, आपण आपले बघू" अशी भाषा वापरल्यानंतर, शिवसेना आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांचा इशारा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर कार्यक्रमात 1 कोटींचा निधी देण्यावरून "मुख्यमंत्र्यांच जाऊद्या मरू द्या, आपण आपले बघू" अशी भाषा वापरल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून शिवसेनेचे उपनेते, सोलापूरचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी पालकमंत्री भरणे यांना शिवसेनेच्या भाषेत सज्जड दम दिला आहे.

हे देखील पहा -

पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकातीत रहा व शब्द वापरा , आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आलात, तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादने तुम्ही सत्तेत आहेत हे कधीच विसरू नका आणि तुम्ही अशी मुख्यमंत्री यांच्या विरोधात वक्तव्य करत आहात. सत्तेत असताना म्हणता मरू द्या मुख्यमंत्री ही भाषा वापरता. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द व भाषा वापरा, तुमच्यात हिंमत असेल व तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची उजनी धरण हद्द ओलांडून दाखवा असा सज्जड दम आमदार सावंत यांनी दिला आहे.

फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे आणि राज्यात महाविकास आघाडी आहे , त्याला तडा जाईल असे वक्तव्य कोणत्याही शिवसैनिक व पदाधिकारी यांनी करायचे नाही या एका बंधनात राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या छाताडावर बसून कोणत्याही पद्धतीने नाचावे व आमच्या पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी गलिच्छ भाषा वापरावी. तुमच्या या वक्तव्याचे योग्य वेळी उत्तर आणि योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय हा शिवसैनिक शांत राहणार नाही. तुमची हिम्मत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवा असे आव्हान उपनेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी राज्यमंत्री भरणे याना दिले आहे. या इशाऱ्यानंतर आता महाविकास आघाडीत वाद पेटला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT