MLA Kailas Patil
MLA Kailas Patil saam tv
महाराष्ट्र

MLA Kailas Patil : 'त्यांची' संपत्ती जप्त करा : जिल्हाधिका-यांचा आदेश

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

MLA Kailas Patil : आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुजोर पिक विमा कंपनी वठणीवर येईल अशी भावना शेतक-यांतून उमटू लागली आहे. उर्वरित 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुणे येथील कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी काढले आहेत. त्याची प्रत साम टीव्हीच्या हाती लागली आहे. त्यामुळे सहाव्या दिवशी आमदार पाटील यांच्या आंदाेलनला यश आल्याची चर्चा आहे. (Osmanabad Latest Marathi News)

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा अनुदान यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गेल्या दाेन तीन दिवस हे आंदाेलन तीव्र करण्यात आले हाेते. (Breaking Marathi News)

दरम्यान जिल्हा प्रशासनाने उर्वरित 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुणे येथील कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढले आहेत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी हे आदेश दिले असून विमा कंपनीची संपत्ती जप्त करण्याचे पुणे (pune) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. (Maharashtra News)

गेल्या सहा दिवसांपासून आमदार पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जप्तीचे आदेश दिले तरी शेतकऱ्यांना (farmers) पैसे मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं पवित्रा आमदार पाटील यांनी घेतला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT