Maharashtra Weather Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Winter Update: पुढचे काही दिवस राज्यात हुडहुडी कायम; गोंदियामध्ये तापमानात सर्वाधिक घसरण

सोमवारी गोंदियामध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

Ruchika Jadhav

Maharashtra Weather News: राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मकर संक्रांतीपासून थंडी जास्त वाढत चालली आहे. १५ जानेवारीपासून १८ जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहणार आहे. (Latest Maharashtra Weather News)

महाराष्ट्रात सध्या तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. सोमवारी गोंदियामध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदियात तापमानाचा पारा ११.५ अंश इतका घासरला आहे. तर गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी पारा सरासरीपेक्षा जास्त असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

नागपूरमध्ये १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच अकोल्यात पुढच्या २४ तासांत बदल जवण्याची शक्यता आहे. सध्याच्या तापमानापेक्षा २ अंशाने तपमानात वाढ होऊन १५.२ अंश तापमान होऊ शकतं. अमरावतीत मात्र थंडी कायम आहे. सरासरी तापमान आहे तसेच पुढचे २ दिवस कायम राहणार आहे. सध्या अमरावतीत १३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता सर्वत्र तापमानात थोडी वाढ होऊ शकते. तापमान सरासरी पेक्षा वरती जाण्याची शक्यता आहे. अशात पश्चिमी वाऱ्यांमुळे पुढचे काही दिवस आणखीन कडाक्याची थंडी पडू शकते. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडी सरासरी असेल तर विदर्भात काही प्रमाणात आणखी घसरण होईल. १८ ते २० जानेवारी या काळात थंडीचा प्रभाव जास्त वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT