FACT CHECK IS ₹550 COIN REAL? HERE’S THE TRUTH BEHIND THE VIRAL CLAIM 
महाराष्ट्र

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

550 Rupee Coin: सोशल मीडियावर ५५० रुपयांचं नाणं लवकरच बाजारात येणार असल्याचा दावा व्हायरल होत आहे. मात्र पडताळणीत काय सांगितले ते पाहा.

Sandeep Chavan

सोशल मीडियावर ५५० रुपयांच्या नवीन नाण्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असं सांगितलं जातंय की, लवकरच बाजारात ५५० रुपयांचं नाणं येणार आहे. मात्र, सामच्या पडताळणीत समोर आलं की हा दावा पूर्णपणे खोटा असून अशा मूल्याचं नाणं जारी करण्यात आलेलं नाही.

आता ५५० रुपयांचं कॉईन बाजारात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ५५० रुपयांचं कॉईन कसं आहे हेदेखील या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. पण, खरंच बाजारात आता ५५० रुपयांचं, १०० आणि ७५ रुपयाचं कॉईन आलंय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना उत्सुकता आहे की खरंच ५५० रुपयाचं कॉईन बाजारात आलं आहे का? एवढं मोठं कॉईन कसं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे सामच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आरबीआयकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने आरबीआयकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

५५० रुपयांचं कॉईन चलनात आलेलं नाही

गुरूनानक यांची २०१९ साली ५५० वी जयंती झाली.

गुरूनानक जयंतीनिमित्ताने सरकारने कॉईन संग्रहात ठेवलं.

पाकिस्तान, नेपाळमध्येही कॉईन बनवण्यात आलं.

कोणतंही चलन चलनात येण्याआधी माहिती दिली जाते.

९ नोव्हेंबर २०१९ साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरूनानकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५५० रुपयांचं कॉईन जारी केलं. मात्र, हे कॉईन चलनात नाहीये. त्यामुळे सामच्या पडताळणीत बाजारात ५५० रुपयांचं कॉईन आल्याचा दावा असत्य ठरला आहे. तुम्ही असे व्हिडिओ पाहून यावर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

SCROLL FOR NEXT