Eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'ताकत लावा, ठाकरेंची मतं भाजपकडे वळवा', 'कसबा'च्या लढाईत CM शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

कसबा पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी शिंदे गटाने गोगावले आणि म्हस्के यांच्यावर सोपवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Maharashtra Politics : पुण्यात सर्वत्र कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी पुण्यात आज शिंदे गटाची आणि भाजपची एकत्रित बैठक होणार आहे. आमदार भरत गोगावले आणि नरेश म्हस्के या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या पदाधिकाऱ्यांना या बाबत सूचना दिल्या आहेत. (Latest Maharashtra Politics)

पुण्यातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलीये. यात त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना जास्त काम करण्याचे आदेश दिलेत.‘कसबा आणि चिंचवडच्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत,त्यासाठी सर्वांनी ताकत लावा. कसब्यातील ठाकरे गटाचीही मतं भाजपकडे कशी वळतील यासाठी प्रयन्त करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत.

कसबा पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी शिंदे गटाने गोगावले आणि म्हस्के यांच्यावर सोपवली आहे. त्याच अनुषंगाने शिंदे गटाचे हे दोन्ही नेते आज पुण्यात बैठका घेणार आहेत. आज दुपारी ३ वाजता शिवसेनाभवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे. भाजपचेही पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः कसब्यात चिंचवडमध्ये रोड शो आणि जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT