Devendra Fadnavis  Saam TV
महाराष्ट्र

Devendra fadnavis: 'देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही' - मुख्यमंत्री फडणवीस

Aurangzeb tomb controversy:'कबरीला पुरातत्व विभागाने ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ घोषित केल्यानं सुरक्षा द्यावी लागते. पण देशात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Bhagyashree Kamble

देशात औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. नेते आणि विश्व हिंदू परिषदेतील काही मंडळी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. औरंगजेबाची थडकी महाराष्ट्रात नकोच, अशा शब्दात काही नेत्यांनी निषेध दर्शवला आहे.

अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीवर प्रतिक्रिया दिलीय. 'देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होऊ देणार नाही, इथे महिमामंडन होईल तर, छत्रपती शिवरायांचे होईल', असं फडणवीस म्हणालेत.

शिवजंयतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या कबरीवरून प्रतिक्रिया दिली आहे. 'आज यातून एक संदेश निश्चितपणे जात आहे. या देशामध्ये महिमामंडन होईल. तर, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं होईल. पण औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही', असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

'खरंतर एएसआयनं पन्नास वर्षांपूर्वी या कबरीला संरक्षण दिलं होतं. त्यामुळे या कबरीचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारवर येऊन पडली आहे. ज्या औरंगजेबानं आमच्या हजारो लोकांची हत्या केली. त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागत आहे. हे दुर्देव आहे'.

'मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही. कबरीचं उदात्तीकरण कधीही होऊ देणार नाही. जर कुणी कबरीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तर, तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही', असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Accident : हायवेवर काळाचा भीषण घाला! नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा भयानक अपघात; ८ जणांचा जागीच दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT