eknath shinde news  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होणार का? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

Vishal Gangurde

Eknath shinde News:

देशातील सर्व राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याचदरम्यान, तुम्ही राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कामाचा आढावा घेतला. नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. . (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अबकी बार 400 पार : मुख्यमंत्री

'तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार का, पत्रकाराच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ' तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यासाठी आभारी आहे. पण त्याला अजून वेळ आहे. पाहिले नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचे आहे. गेल्या 9 वर्षात मोदी यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहेत. अबकी बार 400 पार,फिर एक बार मोदी सरकार आणि राज्यात ४५ पार'.

नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'येत्या 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नाशिकला या कार्यक्रमाचा मान मिळाला, यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. मी याबाबत आढावा बैठक घेतली. 20 कमिटी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी केले आहेत. संपूर्ण देशातून 8 हजार युवा येणार आहेत. 4 वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत'.

'एक मोठा प्लॅटफॉर्म या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. येणाऱ्या लोकांना अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहर देखील सजवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याची आणि नाशिकची परंपरेचा या निमित्ताने प्रचार होणार आहे. सध्या काम जोरात सुरू आहे, अजून काही दिवस आपल्या हातात आहे, असे ते पुढे म्हणाले.

'पीएम नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचेही नियोजन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT