eknath shinde and uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Ekanth Shinde : काही लोक सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले, तर...'; उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता CM शिंदेंचा घणाघात

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Eknath Shinde News : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'सुप्रीम कोर्टाने आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढावा, त्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले, 'आम्ही न्यायप्रिय लोक आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिण असेल. काही लोक सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन करायला आणि सल्ले द्यायला लागले तर मी त्यावर काय बोलू शकतो? असा सवाल करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे न्यायाधीश आहेत का? बावनकुळेंचा सवाल

दरम्यान,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात, १६ आमदार अपात्र होणार असं म्हणतात, हे न्यायाधीश आहे का? सध्या ते न्यायालयात प्रकरण आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

'जनतेच्या मनात संभ्रम आहे. शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेनेचे दोन गट मी मान्य करत नाही. शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार आहे. शिवसेना आमचीच आहे. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

'सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदार अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT