Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: भंडारा जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांची कोट्यवधींची भेट; विविध विकासकामांचं केलं भूमिपूजन

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाने भंडारा शहरासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्याहस्ते सुमारे 200 कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन, लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी गोसेखुर्द धरणाला भेट देत धरणावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटनस्थळाची पाहणी केली. सुरूवातीच्या टप्प्यात दिलेल्या 315 कोटींच्या निधीच्या कामाची पाहणी त्यांनी केली.

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाने भंडारा शहरासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. विकासकामे भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रामुख्याने उपस्थित होते. (Latest Marathi News)

नाशिक नगर येथील मैत्रीय बौद्ध विहारात लायब्ररी उद्घाटन, हुतात्मा स्मारक सौंदर्यीकरण भूमिपूजन, नगरपालिका गांधी शाळा इमारत भूमिपूजन, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन, खाम तलाव चौकातील बहिरंगेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या सौंदर्यीकरण, शहरातील भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील विकासकामे

>> गोसेखुर्द धरणावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटनासाठी 315 कोटींची कामं सुरु आहेत, त्याची आज कामाची पाहणी केली.

>> भंडारा शहरातील मैत्रीय बौद्ध विहारात ई लायब्ररी सुरू करण्यात आली असून यासह भंडारा तालुक्यातील अन्य गावात होणाऱ्या ई लयाब्ररीसाठी 1 कोटी 35 लाखांचा निधी मिळाला.

>> हुतात्मा स्मारक बगीचा सौंदर्यीकरणासाठी 3.5 कोटींचा निधी.

>> नगरपालिका गांधी विद्यालय नवीन इमारतीसाठी 3.5 कोटींचा निधी

>> बहिरंगेश्वर मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणासाठी 9 कोटींचा निधी

>> भूमिगत गटार योजनेसाठी 167 कोटी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

Raj Thackeray: एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचं कारण काय? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Silver Jewellery Cleaning Tips: चांदीचे दागिने घरी कसे साफ करायचे?

Health Care: बटाटे की रताळं...; रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय चांगल आहे?

SCROLL FOR NEXT