Cm Eknath Shinde on Aditya Thackeray saam tv
महाराष्ट्र

Cm Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले..

Satish Kengar

Cm Eknath Shinde Latest News: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक धक्कदायक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. आपण भाजपसोबत जाऊया नाहीतर मला अटक होईल असे ते घरी येऊन म्हणाले होते. यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, 'तो (आदित्य ठाकरे) अजून लहान आहे.'

याच दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचे आजचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''तब्यत एकदम ओके आहे.'' (Latest Marathi News)

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याला संजय राऊत यांनीही दिला होता दुजोरा

संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते आणि आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटत आहे असं म्हणत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

तसेच एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT