CM Eknath Shinde  Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत पोलिसांचा लाठीमार, पाहा VIDEO

CM Eknath Shinde Nashik Function : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या नांदगावमध्ये सभा होती. यासभेत नागरिकांनी एकनाथ शिंदे फुलांचा वर्षाव केला आणि एकच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

Sandeep Gawade

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या नांदगावमधील कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी एकनाथ शिंदे फुलांचा वर्षाव केला आणि एकच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांचा मार चुकवताना काही जण खाली पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, मात्र पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मार खावा लागला आहे.

सभास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगावमध्ये आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती. मुख्यमंत्री येणार असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि हुल्लडबाजीही सुरू केली.

त्यामुळे कार्यक्रमस्थळावर एकच गोंधळ माजला. अडथळे पाऱ करून नागरिक कार्यक्रमस्थळावर पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी काही जण खाली पडले. काही वेळानंतर गर्दी शांत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT