CM Eknath shinde In Nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik: मध्यरात्री २ वाजता मुख्यमंत्र्यांचं मालेगावात जंगी स्वागत; शिंदेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

CM Eknath shinde Nashik Visit : विशेष म्हणजे मध्यरात्री उशिराही एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या दोऱ्याची सुरुवात त्यांनी नाशिकपासून केली आहे. आज नाशिकच्या (Nashik) मालेगावमध्ये ते मध्यरात्री उशीरा पोहोचले. यावेळी मध्यरात्री २ वाजता त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे मध्यरात्री उशिराही एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, मध्यरात्रं असल्याने त्यांनी यावेळी स्पीकर लावण्यास मनाई केली तसेच माईकविनाच उपस्थितांना मार्गदर्शन केलं. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिली. यावेळी ते म्हणाले की, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. नाशिकच्या विकासाच्या सर्व योजना मार्गी लावू असी ग्वाही एकनाथ शिंदेंनी मध्यरात्री दिली. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. तसेच अनेक आजी-माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असून पुढील आठ-दहा दिवसांत ते शिंदे गटात सामील होणार असल्याने नाशिक शहरातही शिवसेनेला खिंडार पडणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान आठ दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला होता. या दौऱ्याला मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे नाशकात शिंदे गट मजबूत करण्यासाठी आणि नाशिकमधील शिंदे गटाच्या आमदार, खासदार, नेत्यांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा महत्वाचा आहे. आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर शहरातील अनेक पदाधिकारीही शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. यापूर्वीच नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे आणि माजी मंत्री दादा भुसे तसेच नांदगावचे आमदार सुहास कांदे हेदेखील शिंदेगटात सामील झाल्याने नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

आज, शनिवारी सकाळी १० वाजता ते पाऊस, अतिवृष्टी पिक- पाणी आणि विकास कामे विभागीय आढावा घेणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास मालेगाव शहरातील क्रिडा संकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवासस्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे मालेगाव लोकार्पण ते करणार आहेत.

यानंतर बोरी-आंबेदरी आणि दहिकुटे कालवा भूमिपूजन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगांव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, जल जिवन मिशन-दाभाडी 12 गांव, माळमाथा 25 गांव. 26 गांव पा.पु. योजना, चंदनपुरी व 32 गावांच्या वैयक्तीक पा.पु. योजना यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद असून यानंतर मालेगावी दुपारीच्या सुमारास पोलीस मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे मालेगाव येथून गाडीने औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूरकडे रवाना होतील. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मनमाड चौफुली येथील कार्यालयास ते भेट देतील. तसेच त्यांचा स्वागत सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार सुहास कांदे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते येवला चौफुलीजवळ होणार आहे. यानंतर त्यांचा वैजापूरमध्ये मुक्काम असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

दादा भुसे मालेगावचे असल्यानं विभागीय आढावा बैठक मालेगावमध्ये होणार आहेत. मात्र त्या आधीच मालेगावाचा जिल्हा असा उल्लेख करण्यात आलाय. मालेगाव जिल्हा करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. दादा भुसे यांनी या आधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यांकडे मालेगाव जिल्हा करण्याची मागणी केलीय, एकनाथ शिंदें यांच्याकडेही पहिली मागणी मालेगावला जिल्हा करण्याचीच केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT