Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politcs : 'मतभेद विसरून एकत्र येत असतील तर...'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis News : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या भूमिकेचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे. या प्रस्तावावर मनसे आणि ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरेंच्या साद आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या भूमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. कोणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर वाईट वाटण्याचे कारण नाही. माध्यमे यावर जास्त विचार करत आहे'.

राज ठाकरे यांना युती प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी अट देखील ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अटीवर फडणवीस म्हणाले, 'ऑफर देणारे हे प्रतिसाद देणार ते. मी काय बोलणार, ही बाब त्यांना विचारा'. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहावे लागेल.

पुरस्कार सोहळ्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अतिशय महत्त्वाची कॉन्फरन्स 2025 झाली आहे. देशभरातील इंडोस्कोपी जगातील फॅकल्टी सहभागी झाल्या. ज्या लोकांनी उत्तम कामगिरी केली, त्यांचा पुरस्कार सोहळा होता. इंडोस्कोपी पोटाच्या आजारांमध्ये फार महत्त्वाची आहे. नवीन शोध आणि उपचार देण्याचा उद्देश आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? यादी आली समोर

SCROLL FOR NEXT