Latur News Saam Tv
महाराष्ट्र

Latur Rain: लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, काँग्रेस आमदारांची मागणी

Latur News: लातूरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Saam Tv

लातूर जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरुड (ता. लातूर) येथे मंगळवारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तसेच अनेकांच्या घरांचे, दुकानांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नागरिकांना मदत करावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.

आमदार धिरज देशमुख यांनी मुरुड इथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडे त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वसन शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना दिलं.

दरम्यान, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुरुड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अचानक पूराची स्थिती निर्माण झाल्याने पूराचे पाणी नागरिकांच्या घरात, बाजारपेठेतील दुकानांमध्ये गेल्याने संसारोपयोगी साहित्य तसेच दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. यानंतर आमदार धिरज देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून नुकसानीची पाहणी केली.

देशमुख यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली. पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने महसूल आणि विमा कंपन्यांना सूचित करुन आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यात पुन्हा शासनाने दप्तर दिरंगाई केल्यास त्यांचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे महसूल प्रशासन आणि विमा कंपन्यांनी अडवणूक न करता त्वरित पंचनामे करावेत, असेही आमदार धिरज देशमुख यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT