'सत्य परेशान हो सकता है पराजित नही' भुजबळांच्या 'क्लीन चीट' वर; अमोल मिटकरींच वक्तव्य -SaamTV
महाराष्ट्र

'सत्य परेशान हो सकता है पराजित नही' भुजबळांच्या 'क्लीन चीट' वर; अमोल मिटकरींच वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ यांना आज मुंबईतील सत्र न्यायालायाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज मुंबईतील सत्र न्यायालायाकडून (Mumbai Sessions Court) मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिल्ली मधील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने आज क्लीन चीट दिली आहेत. या प्रकरणावरती साम टीव्हीशी (SaamTV) बोलत असताना राष्टवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी "सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही" असे म्हणत न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले आहे तर सर्वांसमोर सत्य आलं आहे आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांचे खंडण आज न्यायदेवतेकडून झालं असल्याचही मिटकरी म्हणाले आहेत.(Clean cheat to Chhagan Bhujbal)

हे देखील पहा-

संपुर्ण देशामध्ये गाजलेले महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 26 महिण्याचा तुरुंगवास देखील झाला होता मात्र आज भुजबळ यांना मुंबईतील सत्र न्यायालायाने दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणातून आपलं नाव वगळण्यात यांव अशी याचिका भुजबळ यांनी सत्र न्यायालयात दाखल केली होती याच याचिकेवरती आज मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

जनतेच्या आशिर्वादामुळे निर्दोष सुटलो..

'आज मुंबईतील सत्र न्यायालायाकडून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली ही जनतेच्या आशिर्वादाने झाली असून, मला त्रास झाला असला तरी कोणाविषयी आपल्या मनात राग नसल्याच वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदे मध्ये म्हंटल आहे.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT