मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा अरुण जोशी
महाराष्ट्र

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : आदिवासी बांधवांच्या समस्या घेऊन नंदुरबार येथून धारणी मध्ये आलेले आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Clash between Melghat MLA Rajkumar Patel and tribal activists

हे देखील पहा -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते हे आदिवासी बांधवांच्या मागण्या घेऊन त्यांचे निवेदन देण्यासंदर्भात राजकुमार पटेल यांना भेटण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान आदिवासी बांधवांनी तुम्ही निष्क्रिय आमदार आहात, तुमच्या मतदारसंघातील आदिवासी तरुणांना तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे खडेबोल सुनावले.

मात्र, असे म्हणताच आमदार राजकुमार पटेल यांचा पारा चढला आणि आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व राजकुमार पटेल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

त्यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेस्ट हाऊस मध्ये जाऊन आमदारांविरोधात एक व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी आमदार राजकुमार पटेल यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात पोलिसात तक्रार केली असल्याचे समोर आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT