Abhijit Dipke Exclusive Saam Tv
महाराष्ट्र

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

Abhijit Dipke Cry: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज साम टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना अश्रू अनावर झाले. या मागचे कारण काय ते घ्या जाणून...

Priya More
  • अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारवर टीका केली

  • नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणणाऱ्या मोदी सरकारला सुनावले खडेबोल

  • या मुलाखतीत अभिजीत दिपकेसा अश्रू अनावर

  • सरकारकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल सर्वकाही सांगितलं

साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके यांच्या डोळ्यात अश्रू आले. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी ब्लॅक अँड व्हाईट या शोमध्ये अभिजीत दिपकेची मुलाखत घेतली. यावेळी त्याने देशातील अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. अभिजीत दिपके भाजपची टीम बी असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी देखील त्याच्यावर हे आरोप केले. यावर अभिजित दिपके म्हणाला की, 'यावर अमित शहा देखील हसत असतील.' तर अमेरिकेत नोकरी करत असताना अभिजीतला आपल्या देशातील सरकारकडून मिळाल्या वागणुकीबद्दल सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आले.

अभिजीत दिपकेने सांगितले की, 'जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा सरकारकडून माझे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले. ते बॅन करताना 'National Security Threat' हे शब्द वापरले गेले ते मला खूप लागले. कारण मी महाराष्ट्रातून शिकलो आहे. दिल्लीत काही वर्षे काम केले. त्यानंतर भारताच्या पासपोर्टवर मी अमेरिकेत गेलो. तिथे जी लोकं मला ओळखत होती ते मला भारतीय म्हणून ओळखत होते. पण मला माझ्या देशाचे सरकार National Security Threat म्हणते ही गोष्ट मला खूप लागली.'

अभिजीत दिपके पुढे म्हणाला की, 'मी अमेरिकेत भारतीय म्हणून गेलो होतो आणि तिथे मला माझ्या देशाचे सरकार National Security Threat म्हणत असेल तर ते मला काय म्हणून बघतिल. तिथे आधीच रेसिजम होते आणि त्यात आमच्या देशाचे सरकार असे वागणूक देत असेल तर ती गोष्ट मला खूप लागली आणि मी ठरवले की आता मला माझ्या देशात परत यायचे आहे. मी परत येईन अन् तुमच्यविरोधात बोलेन, मी आंबेडकर आणि गांधींच्या विचारांवर बोलून दाखवेल आणि मला National Security Threat ने हे सर्व सांगायचे होते. आंदोलन करायचे हा काही माझ्या डोक्यात विचार नव्हता. मला फक्त National Security Threat बोलण्यात आले होते त्यासाठी मी परत भारतात आलो होता. पण नंतर लोकांनी जे समर्थन दिले त्यामुळे हे आंदोलन होऊ शकले.'

तसंच, 'हे फक्त माझ्यासोबत झाले नाही. माझी स्टोरी आज समोर येत आहे. जे जे लोकं या सरकारविरोधात बोलतात त्यांना अँटी नॅशनल पाकिस्तानी बोलण्यात येते. म्हणजे यांच्या नावावर लिहून दिला आहे का देश? कधीपर्यंत हे चालणार आहेत. माझी स्टोरी लोकांना कळते कारण माझे आंदोलन यशस्वी झाले आहे. पण असे कित्येक लोकं आहेत ज्यांना मागच्या १० वर्षांत काय -काय नाही बोलण्यात आले. पाकिस्तानचे दलाल आहेत, याचे दलाल आहेत असे बोलण्यात आले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT