Nagar, Shrirampur, DCC Bank, Security Guard, Shrirampur News SAAM TV
महाराष्ट्र

सिक्युरिटी गार्डच्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून शेतकऱ्याचा मृत्यू, जिल्हा बँकेसमोरील थरारक घटना

या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

शिर्डी : नगर (nagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (shrirampur) येथे नगर जिल्हा बँकेच्या (टाऊन शाखा) येथे आज पाऊण वाजता अशोक सहकारी बॅंकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून अनावधानाने गाेळी सुटल्याने एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर बॅंक परिसरात नागरिकांची (citizens) माेठी गर्दी झाली. पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत. (nagar crime news)

घटनास्थळावरुन मिळालेली प्राथमिक माहिती अशी : अशोक सहकारी बँकेतील सिक्युरिटी गार्ड दशरथ पुजारी (Dashrath Pujari) हे कर्मचा-यां बराेबर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या टाऊश शाखेत दैनंदिन कामकाजासाठी आले हाेते.

त्यांच्या साेबत असलेले कर्मचारी हे पैसे भरण्यासाठी बँकेत गेले. पुजारी हे बंदूक खांद्याला लावत असताना बंदूकीतून अचानक गाेळी सुटली. या दरम्यान बँकेच्या बाहेर श्रीरामपूर तालुका प्रगत बागायतदार संस्थेचे सभासद अजित विजय जोशी (रा. दत्त मंदिराजवळ, सार्वमत रोड, वार्ड नं. ७, श्रीरामपूर) हे दुचाकी नजीक उभे असताना सुटलेली गोळी त्यांच्या डोक्यात घुसली. त्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच काेसळले.

यावेऴी बँकेच्या बाहेर माेठ्या संख्येेेने नागरिक जमले. रक्तबंबाळ झालेल्या अजित जाेशींचा जागेवरच मृत्यू झाला हाेता. या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी संदीप मिटके, पीआय संजय सानप हे घटनास्थळी आले. पाेलिसांनी गर्दी बाजूला करीत आलेल्या रुग्णवाहिकेतून जोशी यांचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात पाठवला. अतिरिक्त पाेलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळं परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेतेे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : कांद्याने बळीराजाला रडवलं! प्रति किलो विकला फक्त १ रुपयात, चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT