चित्रा वाघ गरजल्या; संजय राऊतांवर डागले टिकास्त्र 
महाराष्ट्र

चित्रा वाघ गरजल्या; संजय राऊतांवर डागले टिकास्त्र

खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''सर्वज्ञानी संजयजी राऊत (Sanjay Raut) यांना राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी कौतुकाची थाप काय दिली तर आपला त्यावर स्वामीनिष्ठा त्यावर आपली परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे,'' अशा शब्दांत भाजपा नेत्या चित्रा वाघांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिकास्त्र डागलं आहे. (Chitra Wagh Criticized on Sanjay Raut)

तसेच, संजयजी पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे. पुजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देतंय आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं असल्याचही यावेळी चित्रा वाघांनी म्हटलं आहे.

नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरिर सुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला. महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं असल्याचा टोलाही यावेळी चित्रा वाघ यांनी लागावला आहे.

आपल्या अत्याचाराविरूद्ध सुद्धा राज्यातील एका भगिनी न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागतीये. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही या अत्याचारविरोधात अन्यायविरोधात या विकृतीविरोधात लढतोय आणि लढत राहू, त्यामुळंच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात, असेही वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT