Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

परळी ग्रामीण पोलीसाकडून आरोपी मुलाचा शोध सुरू

विनोद जिरे

बीड: पैशाच्या हव्यासापोटी कोणी कधी काय करेल? याचा नेम नाही. बीडच्या (beed) परळीमध्ये (Parli) असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने, चक्क पोटच्या मुलानेच जन्मदात्या आई- वडिलांना लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण (Beating) केली आहे. ही संतापजनक घटना परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव (Savargaon) येथे घडली आहे.

हे देखील पहा-

बाळासाहेब सूर्यभान जाधव (वय-35) रा. खोडवा सावरगाव ता. परळी असे आरोपीचे नाव आहे. सूर्यभान जाधव (वय-65) असे मारहाण झालेल्या वडिलांचे नाव आहे. वडील सूर्यभान जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये सांगितले आहे की, मुलाने आईकडे पैशाची मागणी केली होती. यावेळी तिने पैसे देण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या मुलाने आईला लाथाबुक्क्याने मारहाण (Beating) केली.

हे कळाल्यानंतर मी तेथे गेले. तेव्हा मलाही त्याने मारहाण केली, अशी फिर्याद वडील सूर्यभान जाधव यांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी परळी ग्रामीण (Rural) पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT