अमरावतीमध्ये बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईनला यश  SaamTv
महाराष्ट्र

अमरावतीमध्ये बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईनला यश

अल्पवयीन मुलीची बाल सुधारगृहात रवानगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी बालविवाह पार पडत असल्याची माहिती चाईल्ड लाईनला प्राप्त झाली. सदर विवाहस्थळी पोहचून हा बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईनला यश मिळाले. पोलिस दलातील चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी ही कारवाई केली असून, अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. Child Line succeeds in preventing child marriage in Amravati

हे देखील पहा -

अमरावती येथे 16 वर्षीय मुलीचा 30 जून रोजी बालविवाह होत असल्याची माहिती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी मुलीच्या आई-वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बालविवाह थांबविण्यास तयार नव्हते. तेव्हा गावातील मंडळींनी बालविवाह थांबविण्यासाठी चाईल्ड लाईनची मदत मागितली.

त्यानुसार चाईल्ड लाईनच्या चमुने जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला दुरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यांच्याशी पत्र व्यवहार केले. त्यानंतर पोलीस पथक, जिल्हा बाल सरंक्षण कक्षाचे अधिकारी व चाईल्ड लाईन टीमने घटनास्थळी भेट दिली. लग्न विधीचा कार्यक्रम पार पडण्यापूर्वीच हा बाल विवाह थांबविला. त्यानंतर पुढील कारवाईसाठी हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT