Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

संक्रांतीच्या दिवशी काळाचा घाला; नायलॉन मांजाने गळा कापल्याने लहानग्याचा मृत्यू

वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता, त्यावेळी ही घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : नागपुरात नायलॉन मांजामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. (Nagpur News)

वेद साहू असं मृत मुलाचे नाव आहे. वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. रस्त्यात अचानक मांजा आला आणि त्याचा गळा कापला गेला. दरम्यान त्याला उपचार मिळायला देखील उशीर झाला. अखेर मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळीच त्याचा मृत्यू झाला. (Latest News)

शनिवारी महात्मा गांधी शाळा येथून वेद वडिलांसोबत दुचाकीने जात असताना घडली दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर लगेचच त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. गंभीरित्या गळ्याला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेत 13 वर्षीय ध्रुव धुर्वेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT