Chief Minister Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

CM Shinde On Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणादरम्यान मराठा आरक्षणावर CM शिंदेंचं मोठं वक्तव्य

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेली समिती योग्य काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Bharat Jadhav

(रणजित माजगावकर)

Chief Minister Shinde Maratha Reservation:

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मनोज जरंगे-पाटील यांनी ही बाब समजून घ्यावी. राज्य सरकारला त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार असल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात केलंय. (Latest News)

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आंदोलक आक्रमक झाली आहेत. मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुप्तता पाळत कोल्हापुरातील कार्यक्रमात हजेरी लावली. कोल्हापुरातील श्री सिद्धीगिरी कृषी विज्ञान केंद्र, श्री सिद्धीगिरी महासंस्थानच्या सिवार्चल कार्यक्रमात उपस्थिती लावली. सिद्धीगिरी पशुवैद्यकीय सहाय्य प्रजनन केंद्र, दवाखाना आणि प्रयोगशाळा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटलाय. मराठा समाज आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांनी अतरवाली सराटी गावात आरक्षणासाठी उपोषण सूरू केलंय. जरांगे पाटील हे औषध पाणी देखील घेत नाहीत. जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणावर ठाम निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण करणार असा निर्धार त्यांनी केलाय. याचदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी आरक्षणावर मोठं विधान केलं.

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटलांनी हे गोष्टी समजून घेतली पाहिजे. राज्य सरकाराला त्याच्या प्रकृतीची चिंता आहे. आरक्षणा संदर्भात सरकार काम करत असून न्यायालयात टिकणार आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेली समिती योग्य काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी केली जात आहे. तर ओबीसीच्या गटातून मराठ्या आरक्षण देऊ नये अशी विनंती ओबीसी नेत्यांनी केलीय. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, कोणत्याही समाजावर अन्याय न होता आरक्षण देण्यात येणार आहे. यामुळे मराठा तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केलं.

आरक्षणाचा मिळत नाही तोपर्यंत मंत्र्यांना गावबंदी, आणि रास्ता रोको केला जात आहे. राज्यातील विविध भागात आंदोलने उभारली जाऊ लागली आहेत. मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली जात आहे. आंदोलकांच्या धास्तीमुळे नेत्यांना आपले कार्यक्रम रद्द करावी लागत आहे. मराठा आंदोलकांचा धसका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय.

मराठा आंदोलक रस्ता अडवून नये तसेच कार्यक्रमात गोंधळ घालून यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुप्तता पाळत आज कोल्हापूर दौरा केला. दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना मराठा आंदोलक काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत होते.त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT