CM Eknath Shinde  saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा, रविवारी सपत्नीक करणार श्री विठ्ठलाची महापूजा

श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rakhumai Mahapooja) प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत. रात्री पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता त्यांचे आगमन होणार आहे. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित केलेली 'पर्यावरणाची वारी,पंढरीच्या दारी' कार्यक्रमाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री शिंदे उपस्थिती दर्शवणार आहेत. दरम्यान, रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठीही त्यांची उपस्थिती असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५.३० वा.विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पहाटे ५.४५ वाजता नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यासही मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार आहेत. सकाळी ११.१५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील 'सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभातही मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळी ११.४५ वाजता पंचायत समिती पंढरपूर येथे 'स्वच्छता दिंडी' समारोपालाही त्यांची उपस्थिती असणार.तर दुपारी १२.३० वाजता पक्ष मेळाव्यास उपस्थिती राहून दुपारी ३ वाजता मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे निघणार आहेत. दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री ठाणे येथे जाणार आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT