Eknath Shinde Shivsena News Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde Delhi Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; चर्चांना उधाण

अवघ्या काही तासांसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सुरज सावंत

CM Eknath Shinde Delhi Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (२६ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज सायंकाळी ६.३० च्या सुमार मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराच्या अनुशंगाने महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.

आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकिनंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे दिल्लीसाठी (Delhi) रवाना होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणारं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पक्षाचे 'चिन्ह' आणि 'नाव' मिळाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याने अधिवेशना दरम्यान किंवा त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीत मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या काही तासांसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

Maharashtra News Live Update: एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

हॉकी संघाने इतिहास घडवला! टीम इंडियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचव्यांदा जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT