CM Shinde Meet Sharad Pawar 
महाराष्ट्र

CM Shinde Meet Sharad Pawar: मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची अर्धा तास बैठक; मराठा आरक्षणाबाबत झाली महत्त्वाची चर्चा

CM Shinde Meet Sharad Pawar: शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणज मराठा आरक्षणासंदर्भातही महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Bharat Jadhav

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि पवार यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा बैठक झाली. यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बाकी आहे, त्याबाबत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. येणाऱ्या काही दिवसातच सर्वपक्षीय बैठक पार पडू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. तसेच या बैठकीत अनेक विकासकामे ,पुण्याची पूर परिस्थिती, शेतकरी यांचे प्रश्न अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली.

आज आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यांच्या भेटीत मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासह आधी विषयावर चर्चा झाली. राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT