CM Fadnavis Reaction On Pune Rave Party saam tv
महाराष्ट्र

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

CM Fadnavis Reaction On Pune Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या जावयाला सहा जणांसह अटक करण्यात आली. विरोधकांनी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला.

Bharat Jadhav

  • पुण्यातील खराडीमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून ७ जणांना अटक केली.

  • अटकेतील एकजण भाजप नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर आहेत.

  • विरोधकांनी ही कारवाई राजकीय सूड म्हणून संबोधली आहे.

पुण्यातील खराडीमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या जावईसह ७ जणांना अटक करण्यात आलीय. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांनी पार्टी आयोजित केल्याचा आरोप केला जात आहे. राजकीय सुडापायी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

पुण्यातील खराडी भागात झालेल्या रेव्ह पार्टीबाबत आपल्याला अधिकची माहिती नाही. बिफ्रीग घेतल्यानंतर त्याची माहिती देता येईल, असं फडणवीस म्हणालेत.पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत कोणतीच अपडेट किंवा बिफ्रीन केलं नाहीये. माहिती घेतल्यानंतरच अधिकची माहिती देता येईल. मात्र सकाळपासून माध्यमातून जी माहिती मिळालीये, त्यात पुणे पोलिसांनी छापा मारून काही ड्रग्ज, काही मद्य, काही अमली पदार्थ सापडली आहेत. पोलिसांनी मोठं ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त केलंय. याबाबत अधिकची माहिती मला नाही. मात्र त्याची बिफ्रीग घेतल्यानंतर अधिकीची माहिती देण्यात येईल.

रविवारी पहाटे ३.२० वाजण्याच्या सुमारास सुमारास स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने कारवाई केली. ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल मनिष खेवलकर (वय ४१), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१) सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (२७) ईशा देवज्योत सिंग (२२), प्राची गोपाल शर्मा (२५) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून ४१ लाख रुपये ज्यामध्ये २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींकडून १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट आणि दारू व वियरच्या बॉटल, हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT