छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते- महादेव जानकरांचं वक्तव्य Saam Tv
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते- महादेव जानकरांचं वक्तव्य

जानकरांचं मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देण्याचं आश्वासन, म्हणाले…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणी : 'छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे ओबीसी (obc) होते, कुळवाडी भूषण राजे होते' असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (mahdev jankar ) यांनी यावेळी केले आहे. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. कर्नाटकमध्ये (Karnataka) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे राज्यामध्ये (state) संतापाची लाट ओसरली आहे. तर दुसरीकडे भाजपशासीत (BJP) राज्यामध्ये अशी घटना घडल्याने राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे.

हे देखील पहा-

यातच भाजपच्या घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गंगाखेड (Gangakhed) येथे सुरू असलेल्या ओबीसी एल्गार आंदोलना दरम्यान सभेत छत्रपती शिवाजी महाराज याच्या विषयी वक्तव्य केले आहे. मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहु महाराजांनी पहिले आरक्षण (Reservations) दिले, ते बाबासाहेबांना दिले होते, ते मराठा समाजाचे होते. मराठ्यांना आरक्षण होते, त्यांचे आरक्षण का गेले, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा ओबीसी होते.

कुळवाडी भूषण राजा होता, पण आमच्या तथागतीत लोकांना त्यावेळी आरक्षण नको म्हणून नाही सांगितले अन् आज अवस्था काय झाली, असे वक्तव्य महादेव जानकर यांनी यावेळी परभणीमध्ये केले आहे. 'सामान्य लोकांना सर्वांना न्याय देण्याची विनंती करतो. आमच्या पक्षाचे ३० ते ३५ आमदार येऊ द्या, ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) गमंत १० मिनिटांमध्ये करून दाखवतो. मराठा (Maratha) समाजाला सुद्धा आरक्षण देतो आणि मुस्लिम (Muslim) समाजाला सुद्धा आरक्षण देतो, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले आहेत.

'आज मुस्लिम समाजावर किती अन्याय होत आहे, गॅरेज दिसले की मुस्लिम व्यक्ती असते, अंड्याचे दुकानं म्हटले की मुस्लिम व्यक्ती, कोंबडीचे दुकान बघितले की मुस्लिम व्यक्ती यांचा कुठे कलेक्टर नाही, ना कोणता अधिकारी नाही, नुसती बोंबाबोंब सुरू आहे. ही लोकं फक्त केळी विकता, अंडी विकता आणि काही लोक मुस्लिमांना दोष देत असतात. त्यामुळे हिंदू सुद्धा भिकारी आणि मुस्लिम सुद्धा भिकारी आहे अन् राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, असेही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT