Tension rises in Anjangaon village over dispute surrounding Shivaji Maharaj statue and land ownership. 
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy : छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच राज्यात पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलंय. मात्र हा वाद नेमका काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

हा राडा झालाय सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या तोंडावर माढा तालुक्यात जातीय सलोखा बिघडलाय. दोन समाज आमने-सामने आलेत. खरं तर अंजनगावात मराठा समाजानं परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभा केला.आणि हाच मुद्दा आता वादाचं कारण ठरलाय.

कारण एक समाजानं ही जागा खेळोबा या देवस्थानची असल्यानं पुतळा स्थलांतरीत करण्याची मागणी करत आंदोलन छेडलं. तर दुसऱ्या गटानंही ही जागा शासकीय असल्यानं पुतळा उभारणारच अशी भूमिका घेतली. त्यामुळे अंजनगावात तणाव वाढलाय.

मात्र जमिनीचा नेमका वाद काय आहे? पाहूयात.

अंजनगावच्या चौकात ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला ती जागा खेळोबा देवस्थान ट्रस्टची असल्याचा एका गटाचा दावा आहे. तर खेळोबा हे धनगर समाजाचं देवस्थान असून या जागेशेजारच्या ग्रामपंचायतच्या जागेवर पुतळा उभारण्याची मागणी धनगर समाजानं केलीय.तर ज्या जागेवर पुतळा उभा केला आहे, ही जागा सरकारची असल्याचा दावा मराठा समाजानं केलाय.

खरं तर राज्यात अनेक ठिकाणी सरकारची परवानगी न घेताच पुतळे उभा करण्याचा नवा ट्रेंड सुरु झालाय. त्यात मूळ वाद जमिनीच्या मालकीचा असतानाही यात महाराजांच्या पुतळ्यावरुन जातीय राजकारण उचल खातंय. त्यामुळेच जर वाद जमिनीचा आहे तर त्यात महाराजांच्या पुतळ्यावरुन जातीय राजकारण का केलं जातयं. त्यामुळे मुळ वादावर तोडगा काढावा, त्याला जातीय रंग नको .असं आवाहन साम टीव्ही करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT