Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

पाकिस्तान जिंदाबाद असं कंपनीतील मशीनवर लिहिलं, पाकड्यांचं समर्थन करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर लिहिला होता. या तरुणाचा फोन देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

Yash Shirke

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने कंपनीतील मशीनवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ मजकूर लिहिला आहे. कंपनीच्या मशीनवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असा मजकूर लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर शेख या तरुणाने कंपनीतील मशीनवर पाकिस्तान जिंदाबाद असा पाकिस्तानचे समर्थन करणारा मजकूर लिहिला होता. या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आमिर शेखला अटक केली आहे. त्याचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

पुण्यात तरुणीवर कारवाई

पुण्यात काही दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय तरुणीवर पोलिसांनी कारवाई केली होती. या तरुणीने पाकिस्तान जिंदाबाद असे सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते. पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे पुण्यातील कोढंवा भागात राहणाऱ्या तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिला अटक देखील करण्यात आली होती.

सकल हिंदू समाजाच्या मते, पुण्यात शिक्षण घेणारी तरुणी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत होती. तिने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देखील लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तरुणीने तिचे अकाउंट डिलीट केले होते. पण व्हायरल पोस्टमुळे ती अडचणीत आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT