Prashant Bamb Rally Saam Tv
महाराष्ट्र

Prashant Bamb Rally: भाजपच्या प्रशांत बंब यांच्या सभेत वाद पेटला; तुफान राडा, पाहा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघामध्ये प्रशांत बंब हे प्रचारासाठी गेले होते. गवळीशिवरा येथे त्यांची सभा पार पडली.

Priya More

आमदार प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये राडा झाल्याची धटना समोर आली आहे. प्रशांत बंब यांना प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला मारहाण करत त्याला सभेतून बाहेर काढण्यात आले आहेत. या सभेतील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघामध्ये प्रशांत बंब हे प्रचारासाठी गेले होते. गवळीशिवरा येथे त्यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान काही सामान्य नागरिकांनी त्यांना विकासाबद्दल प्रश्न विचारले.

'तुम्ही १५ वर्षांत काय केले? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी त्या सामान्य नागरिकाला चांगलेच धारेवर धरले. सामान्य नागरिकांनी तरी देखील प्रश्न विचारले. यावेळी प्रशांत बंब यांनी या व्यक्तीला बाहेर घ्या असे सांगितले. तर प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करत या व्यक्तीला थेट सभास्थळावरून बाहेर काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT