Accident News Saam tv
महाराष्ट्र

Sillod Accident News: हृदयद्रावक! कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात; पती- पत्नी जागीच ठार

Sillod Accident News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात असणाऱ्या शिवसेना भवनासमोर त्यांच्या दुचाकीचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ३० जानेवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar Accident News:

छत्रपती संभाजीनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजीम रवानी सय्यद आणि आशिया अजीम सय्यद जात होते. यावेळी सिल्लोड (Sillod) शहरातील आंबेडकर चौकात असणाऱ्या शिवसेना भवनासमोर त्यांच्या दुचाकीचा आणि कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात अजीम सय्यद आणि आशिया सय्यद या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर दुसरीकडे धुळे सोलापूर महामार्गावरही (Dhule Solapur Highway) भीषण अपघाता झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील हॉटेल गोदावरी समोर ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तरुण तेजस जाधव जागीच ठार झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT