Alleged ₹250 crore scam in Chhatrapati Sambhajinagar’s Public Works Department has led to the formation of an inquiry committee under chief engineer Atul Chavan. saam tv
महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये 250 कोटींचा घोटाळा? सार्वजनिक बांधकामच्या घोटाळ्यामुळे खळबळ

Chhatrapati Sambhajinagar PWD 250 Crore Scam: छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात २५० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर काढण्यात आल्याची बाब उघडकीस आली.

Bharat Mohalkar

  • संभाजीनगर PWD मध्ये अडीचशे कोटींचा घोटाळा उघड

  • बोगस वर्क ऑर्डर आणि QR कोड फेरफाराचा आरोप

  • अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताची शक्यता

राज्यात घोटाळ्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस वर्क ऑर्डर काढून अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा करुन अधिकारी आणि कंत्राटदारांनी उखळ पांढरं केल्याचा आरोप करण्यात आलाय. . मात्र हा घोटाळा नेमका कसा घडलाय. पाहूयात.

जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामाच्या बोगस वर्क ऑर्डर काढण्यात आल्या.. हा घोटाळा क्यू आर कोडमध्ये फेरफार करुन कऱण्यात आल्याचा आरोप आहे.. क्यू आर कोड एकाचा आणि वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावाने काढण्यात आलीय. या रॅकेटमध्ये टेंडर क्लार्क, विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता गुंतल्याचा आरोप आहे.. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आलीय.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या समितीवरच ठाकरेसेनेनं आक्षेप घेतलाय. तर या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी ठाकरेसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी केलाय.तर या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

आता छत्रपती संभाजीनगरमधील बोगस वर्क ऑर्डरच्या रॅकेटमध्ये गब्बर झालेले कंत्राटदार आणि घोटाळा करुन पैसे लाटणारे अधिकारी यांची सगळी साखळीच उखडून टाकण्याची गरज आहे.. त्यासाठी विरोधकांनी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केल्यानं सरकार ही मागणी मान्य करणार का? याकडे लक्ष लागलंय. नाहीतर याच विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली तर ही चौकशी फक्त फार्स ठरण्याचीच शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

SCROLL FOR NEXT