Sanjana Jadhav  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjana Jadhav: भरसभेत रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव ढसाढसा रडल्या, पाहा VIDEO

Sanjana Jadhav Cried: कन्नडमधील एका गावात भाषणादरम्यान संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्याकडून काय काय सोसले हे सांगितले. त्यावेळी त्यांना रडू कोसळले.

Priya More

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर झाले. कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या हर्षवर्धन जाधव - संजना जाधव अशी लढत आहे. या मतदारसंघामध्ये पती-पत्नीच निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमने-सामने आले आहेत.

कन्नडमधील एका गावात भाषणादरम्यान संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्याकडून काय काय सोसले हे सांगितले. त्यावेळी त्यांना रडू कोसळले. संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

लग्नानंतर पहिल्याच महिन्यात त्या माहेरी आल्या. नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला त्या कंटाळल्या होत्या. पण वडील रावसाहेब दानवे यांनी त्यांना सल्ला दिला आणि त्या पुन्हा सासरी गेल्या. अजूनही संजना जाधव आणि रावसाहेब दानवे हे हर्षवर्धन जाधव यांचा त्रास सहन करत आहेत. हे सर्व भरसभेत सांगत असताना संजना जाधव यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि त्या रडू लागल्या. त्यामुळे थोडा वेळ भाषण थांबवून त्या पाणी प्यायल्या आणि नंतर पुन्हा भाषण सुरू केले.

संजय जाधव यांनी भरसभेत सांगितले की, 'माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले. पण आम्ही ते सहन केले. कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात म्हणून आम्ही सहन केले. एका मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता. पण एका मुलीचा बाप आहे म्हणून ते शांत बसले.' हे सांगताना संजना जाधव यांना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT