Severely damaged container and Eicher trucks after a deadly head-on collision near Shivpur village on Shekta–Isarwadi highway. 
महाराष्ट्र

Truck-Container Accident: कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; वाहनांचा चक्काचूर, दोन्ही ट्रकमध्ये चालक चेपला

Chhatrapati Sambhajinagar Accident: शेकटा-इसरवाडी महामार्गावर कंटेनर आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • शेकटा–इसारवाडी महामार्गावर कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक

  • दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार

  • अपघातानंतर अवजड वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा–इसारवाडी महामार्गावर भीषण अपघात झालाय. महामार्गावर कंटेनर आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झालाय. शेकटा ते इसारवाडी मार्गावरील शिवपूर गावानजीक हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे केबिन एकमेकांच्या आत अडकली होती. वाहनांसह चालकांचा देखील चुराडा झाला.

शेकटा–इसारवाडी महामार्गावर झालेला अपघात कशामुळे झाला? कोणाची चुकी होती याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये. दरम्यान दोन्ही वाहने ही अवजड वाहने असल्याने अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दुर्घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून ते मृत चालकांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT