Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: तुळशीसमोर दिवा लावत तरुणीने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

Satish Daud

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. शहरातील वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

तेजस्विनी विष्णू जोशी (वय २० वर्ष) असं मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विनीला डॉक्टर बनायचं होतं. यासाठी ती नीट परीक्षेची तयारी करत होती. गेल्यावर्षी तिला नीट परीक्षेत कमी गुण मिळाले होते. यंदा पुन्हा तिने परीक्षेसाठी जोरदार तयारी केली. मात्र, यंदाही नीट परीक्षेत तेजस्विनीला कमी गुण मिळाले.

दरम्यान, शुक्रवारी तेजस्विनीने तुळशीसमोर दिवा लावून बेडरुममध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस्विनी अतिशय हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी होती. तिच्या अचानक निघून जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं प्रमाण सर्वाधिक आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी शहरातील हर्सूल परिसरात राहणाऱ्या प्रिया रमेश बुजडे या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं प्रियाने चिठ्ठीत नमुद केलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश; 'ही' काम करा नाहीतर अडकेल पगार

Avdhoot Gupte: 'विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा...'; अवधूत गुप्तेंनी विद्यानंद बापटांसाठी लिहिलं खास गाणं, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती

Shocking: पाणी पुरवठ्यावरून सरपंचाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं

SCROLL FOR NEXT