crime news Saam Tv
महाराष्ट्र

Naregaon Crime: उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग; सख्ख्या भावानेच भावासोबत केले भयंकर कृत्य

Crime News Update: सहा वर्षांपूर्वी उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या भावावर जोरदार हल्ला चढवण्यात आला.

Gangappa Pujari

नवनित तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime: उसने दिलेले पैसे परत मागितल्याने भावानेच भावाला दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहा वर्षांपूर्वी उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागण्यासाठी गेलेल्या भावाचे डोके भावानेच दांड्याने मारहाण करून फोडल्याची घटना शहराजवळील नारेगाव भागात उघडकीस आली आहे.

अताउर रहेमान अब्दुल रहेमान सिद्दीकी यांनी भाऊ जहाउर रहेमान अब्दुल रहेमान सिद्दीकी यांना सहा वर्षांपूर्वी दोन लाख रुपये उसने दिले होते. ते मागण्यासाठी अताउर पत्नीसह जहाउर यांच्याकडे गेले असता त्यांच्यावर भावाने हल्ला केला. (Latest Marathi News)

वडील अब्दुल रहेमान मुनीम सिद्दीकी, बहीण महेशरजहाँ अब्दुल रहेमान या तिघांनी अताउर आणि त्याच्या पत्नीला पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT