Female Conductor Beat Passenger Video  Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: बस थांबवण्यावरून वाद, महिला कंडक्टरकडून प्रवाशांना मारहाण; धक्कादायक VIDEO व्हायरल

Female Conductor Beat Passenger Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कंडक्टरने प्रवाशांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला कंडक्टरने प्रवाशांना मारहाण केलीय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. धुळे-सोलापूर रस्त्यावर पाचोड बस स्थानक आहे. हे बसस्थानक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्वाचं मानलं जातं. रोज या ठिकाणावरून दोनशे ते जवळपास अडीचशे प्रवासी ये-जा करत असल्याची माहिती मिळत आहे.

महिला कंडक्टरने प्रवाशाच्या कानशि‍लात लगावली

पाचोड बस स्थानकावर सर्वच बस थांबा घेतात. मात्र काही कंडक्टर मुजोरी करतात. पाचोड येथील काही विद्यार्थी आणि प्रवाशांना 'आडूळ' थांबा घेत (Chhatrapati Sambhajinagar News) नाही. आजही असंच घडलं होतं. एका महिला वाहकाने आडूळ थांब्यावर बस उभी करण्यास नकोर दिला. त्यामुळे अजय डुकळे या प्रवाशांनी पाचोड येथून आडुळ वरती प्रवासी घेण्यास विनंती केली होती.

प्रवाशी आणि बस कडंक्टरमध्ये बाचाबाची

परंतु महिला बस वाहकाने नकार (Fight Video) दिला. त्यामुळे प्रवाशी आणि बस कडंक्टरमध्ये बाचाबाची झाली. यावादाचं रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. शाळेतील मुलींना बसमध्ये घेण्याची विनंती प्रवाशांनी केली होती. परंतु यास महिला कंडक्टरने नकार दिल्याने हा धक्कादायक प्रकार (Female Conductor Beat Passenger) घडला आहे.

मारहाणीचा VIDEO व्हायरल

सुरूवातीला प्रवाशी अन् कंडक्टर महिलेत शा‍ब्दिक वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या कंडक्टर महिलेनं थेट प्रवाशाच्या कानशि‍लात (viral video news) लगावली. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. या घटनेप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले आहेत. एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT