Chhatrapati Sambhajinagar Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: जन्मदात्या आईचे निर्दयी कृत्य! धनलाभासाठी पोटच्या मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Chhatrapati Sambhajinagar News: धनलाभासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Crime: धनलाभासाठी जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, धनलाभासाठी आईनेच मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याने संभाजीनगर शहर हादरुन गेले आहे. गुरूवार (१७ ऑगस्ट) रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी मुलीने आई आणि तांत्रिक महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात मुलीने दिलेला सविस्तर वृत्तांतानुसार, घटनेच्या दिवशी पहाटे मला पेट्रोलचा वास आल्याने जाग आली. यावेळी मला माझीच गोधडी पेटल्याचे दिसले. यावेळी मी जीव वाचवण्यासाठी पळाले, मात्र आई तिथेच असताना मला कसलीही मदत केली नसल्याचे तिने सांगितले. तसेच भाऊ प्रसादने त्याच्याकडे असलेल्या गोधडीने माझ्या अंगाला लागलेली आग विझविल्याचेही तिने सांगितले.

मुलीच्या तक्रारीनुसार तांत्रिक शकुंतला अहिरे आणि आई पार्वती हुलमुख यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही तसेच जादूटोणाविरोधी कायद्याची कलमेही लावण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT