Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग, ३० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला; १०० रुपयांसाठी फोडले डोके

Crime News Update: अवघ्या १०० रुपयांसाठी झालेल्या या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar Crime News: उसने दिलेले 100 रुपये परत मागितल्याच्या कारणावरून एका 30 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत कुऱ्हाडीने डोके फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जोगेश्वरी परिसरातील ह प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरातील सुंदर चौतमल याने शेजारी राहत असलेल्या काळ्या शकील शेख या तरुणास आठ दिवसापूर्वी 100 रुपये हात उसने दिले होते. हे उसने पैसे परत मागितल्याने शकील आणि सुंदरमध्ये वाद झाला. यावेळी शकील शेखने सुंदर यास जातिवाचक शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अमन शेख याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुंदर चौतमल याच्या डोक्यात मारून त्याचे डोके फोडले.

या प्रकरणी सुंदर चौतमल यांनी दिलेल्या एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवघ्या १०० रुपयांसांठी झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

चहासाठी विचारल्याने मित्राला संपवले...

किरकोळ वादातून हत्या झाल्याची एक घटना मुंबईमध्ये समोर आली आहे. दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून झोपेत असताना मित्राने त्याला चहा पिण्यासंदर्भात विचारणा केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या तरुणाने रस्त्यावरील फेवर ब्लॉक डोक्यात घातला, ज्यामध्ये मित्राचा दुर्देवी मृत्यू झाला. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Song Controvery: नोरा फतेहीला मोठी झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, यूट्यूबवरूनही गाणं हटवलं

Jio Recharge: SIM चालू ठेवण्यासाठी Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत फक्त...

Shocking : धक्कादायक! नवीन मोबाइल फोन घेऊन दिला नाही, पुण्यात महिलेची आत्महत्या

Eknath Shinde On Uddhav Thackeray: आमदारकीसाठी ठाकरेंना मदत करणार का? एकनाथ शिंदे हसले अन् एका वाक्यात विषय संपवला

Maharashtra Live News Update: भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या बंदरात दाखल

SCROLL FOR NEXT