Chhatrapati Sambhajinagar News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: पत्नीसह भाचीला वाचवण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; खुलताबाद तालुक्यातील घटना

Chhatrapati Sambhajinagar News: पत्नीसह भाचीला वाचवण्याच्या नादात एका तरुणाचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात घडली.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Latet News

पत्नीसह भाचीला वाचवण्याच्या नादात एका तरुणाचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात गुरुवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. दगडू सुखदेव अहिरे, असे मृत तरुणाचे नाव असून तो सुलीभंजन गावातील रहिवासी आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन गावात राहणारे अहिरे कुटुंबिय गुरुवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावाजवळील जाकेर नाल्यावर गेले होते. यावेळी मृत दगडूची भाची शालीनी हिचा पाय घसरुन ती नाल्यातील पाण्यात पडली.

तिला वाचवण्यासाठी दगडूच्या पत्नीने पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्या खोल पाण्यात बुडू लागल्या. पत्नी आणि भाचीला बुडताना पाहून दगडूने नाल्याच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याच्या अंदाज न आल्याने तोही बुडू लागला.

आरडाओरड झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने नाल्याच्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांनी जीव पणाला लावत दगडूच्या पत्नी आणि भाचीला पाण्याबाहेर काढले. मात्र, शोधाशोध घेऊनही दगडूचा थागपत्ता लागला नाही. खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पत्नी आणि भाचीला वाचवण्याच्या नादात तरुणाचा जीव गेल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

SCROLL FOR NEXT