Chhatrapati Sambhaji Nagar News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar News: 'बामू' विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अत्याचार प्रकरणातील फरार प्राध्यापक बंडगरला अल्टीमेटम

Marathwada News: आरोपी बंडगर आणि त्याची पत्नी १३ दिवसांपासून फरार

डॉ. माधव सावरगावे

BAMU News: छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेला प्राध्यापक अशोक बंडगर गेल्या 15 दिवसांपासून फरार आहे. पोलिसांना सापडत नसल्यानं चौकशी कशी करायची असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडलाय.

त्यामुळे आता विद्यापीठाने 13 मेपर्यंत त्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश असताना तो विशाखा समितीकडे परस्पर खुलासे पाठवत आहे. वकील, दूतामार्फत आणि टपालाने खुलासा पाठवत आहे. असे खुलासे अजिबात गृहीत धरणार नसल्याचं विद्यापीठाने स्पष्टपणे सांगितले आहे. (Latest Marathi News)

जर त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही तर त्याला सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे. विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचे शोषण करणारा बंडगर आणि त्याची पत्नी १३ दिवस झाले तरीही फरार आहे.

विद्यापीठाने त्याला दहा दिवसांत प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश २४ एप्रिल रोजी दिले होते. ही मुदत ६ मे रोजी संपली आहे. त्यामुळे अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या पीठासीन अधिकारी डॉ. अंजली राजभोज यांनी पुन्हा त्याला अल्टिमेटम दिला आहे. ८ मे रोजी तशी नोटीस त्याच्या घरावर चिकटवण्यात आली आहे. (Marathwada News)

त्याशिवाय त्याच्या मेलवरही पाठवण्यात आली आहे. तरीही तो प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाला लेखी खुलासा पाठवत आहे. १ ते ४ मे दरम्यान त्याने विशिष्ट दूतामार्फत खुलासा दिला. विद्यापीठाने तो खुलासा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने वकिलामार्फत खुलासा दिला तोही घेतला नाही. टपालाने एक खुलासा पाठवला. विद्यापीठाने टपालाने आलेला खुलासाही गृहीत धरलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT