Chhatrapati Sambhaji Nagar News Saam TV
महाराष्ट्र

Sillod Crime News: एका ग्लासमध्ये दारू ढोसली, पण मटणाच्या पिसावरून वाद झाला; मित्रानेच केली मित्राची हत्या

Chhatrapati Sambhaji Nagar News: ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या धारला गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhaji Nagar News: शेतात मटण पार्टी सुरू असताना मटण वाढण्यावरून दोन मित्रांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की मित्रानेच मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत त्याची हत्या केली. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या धारला गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.  (Latest Marathi News)

जितेंद्र धृवे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयित आरोपी ओम जय सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि ओम हे दोघेही मध्यप्रदेशातील रहिवाशी आहे. ते मोलमजुरी करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धारला गावात राहत होते.

मंगळवारी जितेंद्र धृवे आणि संशयित आरोपी ओम सूर्यवंशी यांनी शेतात मटणाची पार्टी केली. यावेळी दोघांनीही दारू ढोसली. पार्टी सुरू असताना मटण वाढण्यावरून दोघांमध्ये वाद (Crime News) सुरू झाला. मटण कोण जास्त घेईल यावरून दोघात चांगलीच बाचाबाची झाली.

दोघेही दारूच्या नशेत असल्याने शेतमालकांनी त्यांचे भांडण सोडवले. मात्र काही वेळाने याच मुद्द्यावरून पुन्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला, की संतप्त झालेल्या ओमने दारुच्या नशेत जितेंद्रवर लोखंडी रॉडने जोरदार वार केला. (Breaking Marathi News)

या घटनेत जितेंद्र गंभीरित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT