Chhatrapati Sambhaji Nagar Crime News, Police, Girl saam tv
महाराष्ट्र

प्यार किया तो डरना क्या म्हणत Love Marriage केलं, मुलगी झाल्याने पत्नीला साेडलं; प्रकरण पाेलिसांत गेलं ना भाऊ !

या घटनेमुळे हे कसले प्रेम असा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे.

Siddharth Latkar

- नवनीत तापडीया

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : प्रेमसंबंधातुन आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीस वर्षभरानंतर मुलगी होताच माहेरी सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह कौटुंबिक छळाचा गुन्हा पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात नोंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

पीडितेने प्रेमसंबंधानंतर अमेयकुमार या युवकासमवेत 24 मे 2021 रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. पीडिता अनुसूचित जातीतील असल्यामुळे अमेयकुमारच्या कुटुंबांनी लग्नानंतर त्यांना घरात घेण्यास नकार दिला.

त्यानंतर वारंवार तिला त्रास देत, फ्लॅट खाली करण्यास सांगितले. यातच पीडितेने 16 जुन 2022 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याची माहिती सासरच्यांना झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा नांदवायला नेण्यास नकार दिला.

पीडितेने क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून चौघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानूसार पाेलिसांनी चाैघांवर गुन्हा नोंदवला.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युवतीच्या तक्रारीवरुन पती अमेयकुमार नितीनचंद्र पाटील, सासरा नितीनचंद्र रामचंद्र पाटील यांच्यासह दोन महिलांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT