Chhatrapati Sambhajinagar News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajigar News : बहिणीला फोन करून भावाने, तर भाऊ रागावल्याने बहिणीने संपवलं आयुष्य; छत्रपती संभाजीनगरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवसात 3 जणांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मंगळवारी (ता. ६) घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवसात 3 जणांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मंगळवारी (ता. ६) घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. बहिणीला फोन करून भावाने, तर भाऊ रागावल्याने बहिणीने टोकाचं पाऊस उचलल्याचं समोर आलंय. तर लग्नानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच एका अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

संंभाजीनगरमध्ये एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

सौरभ पाटील (वय २४) सुहाना शेख (वय १४) आणि रोहित भरत खोपडे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित खोपडे याचे दीड महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तो वाळूज परिसरात कुटुंबियांसहित वास्तव्यास होता.

बुधवारी कामावर जाण्यासाठी त्याने पत्नीकडून डबा तयार करून घेतला. पत्नी घराबाहेर जाताच रोहितने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.

भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या

हर्सुल परिसरातील चेतनानगर पोलीस कॉलनीत राहणारी सुहाना शेख (वय १४) बुधवारी आपल्या लहान बहिणीला सांभाळत होती. यावेळी बाळ रडत असल्याने तिच्यावर भाऊ रागावला. यातून सुहानाला राग अनावर झाला. तिने स्टडी रुममध्ये जाऊन गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बहिणीला फोन करून भावाची आत्महत्या

आत्महत्येची तिसरी घटना सिडको परिसरात घडली. सौरभ प्रमोद पाटील हा चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला कंपनीने काम करण्यास सांगितलं. यातून सौरभ नैराश्यात गेला. बुधवारी त्याने बहिणीला फोन करून आई-वडिलांबाबत विचारपूस केली. त्यानंतर गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT