Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: पुढच्या मेळाव्यात मी जरांगेंच्या बाजूने भाषण करेन; छगन भुजबळांची उपहासात्मक टीका

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात सातत्याने शाब्दित चकमक होताना दिसतेय.

Ruchika Jadhav

Chhagan Bhujbal News:

मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात सातत्याने शाब्दित चकमक होताना दिसतेय. अशात पुढच्या मेळाव्यात मी जरांगेच्या बाजूने भाषण करेन, अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर उपहासात्मक टीका केलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण नाराज आहे आम्ही अजिबात नाराज नाही. मी जरांगेंबाबत केलेली सर्व वक्तव्य मागे घेतो. त्यांच्या अभिनव कल्पना एकमद बरोबर आहेत. जरांगेंनी सरकारला वेटीस धरलं नाही तर सरकारने जरांगेंना वेटीस धरलं आहे. पुढच्या मेळाव्यात मी जरांगेच्या बाजूने भाषण करणार.होय मी याबाबत युर्टन घेतलाय, अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर टिप्पणी केलीय.

जरांगेच्या मनातील अभिनव कल्पना येत असतात. मग सर्व मंत्री जातात, त्यापेक्षा आपलेच मंत्री तिथे गेले तर बरं होईल. आंतरवाली सराटी येथेच मंत्र्यांच्या राहण्याची सोय केली पाहिजे. माग जीआर ताबडतोब निघतील, अशा शब्दांत छगन भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

देव सुद्धा जरांगेंना घाबरतात

आरक्षणावरून जरांगेंवर टीकास्त्र सोडताान भुजबळ पुढे म्हणाले की, सकारचं काय म्हणणं ते मला माहिती नाही. जरांगे पाटील यांनी सरकारला कुठेही वेठीस धरलेलं नाही. देव सुद्धा त्यांना घाबरतात. कायदा काय तो तुम्हीच करायचा. जरांगेंच्या मागण्या फार लॉजिकल आहेत, अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT