Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगल्यानंतर गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतलीय. भाजपचे संकटमोचक महाजन यांनी छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी)

नवी दिल्ली : महायुतीमधील नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी आज त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी महाजन यांनी भुजबळ यांच्या नाराजी कारण सांगितलं.

महायुतीमधील अजित पवार गटात आलबेल नसून सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ नाराज असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जयंत पवार यांनी केला होता. छगन भुजबळ नाराज आहेत हे ऐकून असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते. दरम्यान मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली होती.त्यामुळे ते नाराज असल्याचं म्हटलं जात होतं,त्याचवेळी छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची'भुजबळ फार्म'येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भुजबळ नाराज आहेत का नाहीत हे सांगितलंय. माझा आज वाढदिवस असल्याने भुजबळांची भेट आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. प्रचाराला शेवटचे दोन दिवस बाकी राहिलेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांची भेट घेतल्या महाजन यावेळी म्हणाले.

आता कुठली नाराजी. मोदींच्या सभेत भुजबळ साहेबांनी जोरदार भाषण केलं.त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केलं.मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचं आहे.हे त्यांनी सांगितलं, त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याचं महाजन म्हणालेत. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवार गटात येणार असल्याचा, दावा अनिल देशमुख यांनी केला होता.

यावर बोलताना गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना सुनील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका,असा टोला मारला. देशमुख जेथे आहेत तेथे ते स्थावर आहेत का ? असा सवालही महाजन म्हणाले. तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सर्व आमदारांना भेटतात, त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यामुळे त्यांच्या नाराजी प्रश्न येत नाही असं महाजन यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT