Suhas kande Vs Chhagan Bhujbal:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Nashik Political News : नांदगावचे आमदार सुहास कांदे राजकीय विधाने करण्यात तरबेज आहेत. बुधवारी त्यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांनाच आव्हान दिले. त्यामुळे नांदगाव मतदारसंघ पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षामुळे चर्चेचा विषय बनला आहे. नेमकं काय घडलंय पाहूया

Vishal Gangurde

नाशिक : आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर मविआ आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. मात्र नाशिक जिल्ह्यात महायुतीत कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. एकनाथ शिंदे गटाचे नांदगावचे आमदार कांदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. याबाबत बुधवारी मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक ट्विट केलं. या ट्विटनंच कुरघोडीच्या राजकारणाची सुरुवात झाली.

भुजबळांची खोडी,कांदेंचं आव्हान

भुजबळ यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, 'नाशिकच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव - मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला मनापासून सदिच्छा'.

या ट्विटनंतरच सुहास कांदेंनी थेट छगन भुजबळांनाच नांदगावच्या मैदानात येण्याचं खुलं आव्हान दिलंय. एवढंच नव्हे तर येवल्यातूनही आपली भुजबळांविरोधात लढण्याची तयारी असल्याचं कांदेंनी म्हटलंय.

त्यामुळे आमदार कांदे यांचा हा बाण मंत्री छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.एकंदरीत आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि राजकीय खडाखडी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू राहणार आहे. त्यात महायुतीत बंडखोरी अटळ दिसते. त्यामुळे नांदगाव मतदारसंघ पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध कांदे या संघर्षामुळे चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाला जन्मठेप; कोर्टाचा निकाल

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Omar Abdullah: मुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, ३२ वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले

Beauty Tips : स्किनटोननुसार लिपस्टिकची निवड कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT