चेन्नई बीचवर सेल्फी घेताना मोठ्या लाटेमुळे तीन विद्यार्थी समुद्रात वाहून गेले
भंडाराच्या मयुरी चौधरीचा मृत्यू; जळगावचा जय पाटील बेपत्ता
एका विद्यार्थ्याची सुरक्षित सुटका
प्रशासन व सरकारकडून कुटुंबीयांशी संपर्क आणि मदतकार्य सुरू
चेन्नईत इंटर्नशीपसाठी गेलेल्या २६ पैकी तीन जण बुडाल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे पाण्यात उतरून सेल्फी घेत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये भंडाराच्या मयुरी चौधरीचा मृत्यू झाला असून जय पाटीलचा शोध अद्यापही लागलेला नाही, त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यातील तिसरा तरुण राज केदारी याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील कॉग्नीझंट या आयटी कंपनीत महाराष्ट्रातील काही मुलं इंटर्नशिप करत आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने तरुण-तरुणी चेन्नई येथील पुद्दुचेरी रोडवर असलेल्या कांथाट्टूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बीचवर फिरण्यासाठी गेली होती.
पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर ग्रुप सेल्फी घेत असताना अचानक मोठी लाट उसळल्यामुळे २६ जणांपैकी तीन मुलं समुद्रात वाहून गेली. यापैकी मयुरी चौधरी हिचा मृतदेह सापडला आहे, तर राज केदारी नावाच्या मुलाला सुखरुपपणे बचाव पथकाने बाहेर काढलं आहे. मात्र जळगावचा जय पाटील अद्याप बेपत्ता आहे. मयुरी आणि जय यांचे कुटुंबीय महाराष्ट्रातून चेन्नईला रवाना झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आहेत. स्थानिक सरकारला सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान मयुरी ही चेन्नईच्या आयटी कंपनीत १५ दिवसांपूर्वीच ट्रेनी म्हणून रुजू झाली होती. तिच्या मृत्यूची बातमी काल सायंकाळी तिच्या कुटुंबीयांना म्हणजेच तिच्या भावाला मयुरीच्या मैत्रिणीकडून ही दुःखद घटना कळली. यानंतर चेन्नई पोलिसांकडून फोनद्वारे माहिती मिळाली. तल्लख बुद्धीची आणि मनमिळावू स्वभावाची मयुरी अचानक निघून गेल्याने चौधरी कुटुंबीयांसह वर्डी वाशियांवर एक दुःखाचे डोंगर कोसळलं आहे. मयुरी चौधरी हिच्या मृत्यूच्या बातमीनं तिच्या घरी आता आप्तेष्ट जमायला लागलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.