Nitesh Rane Saam Tv
महाराष्ट्र

संतोष परब हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल; नितेश राणेंचा कणकवलीत जाण्याचा मार्ग मोकळा

तपास अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

वृत्तसंस्था

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणातील दोषारोपपत्र कणकवली पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांचा कणकवली तालुक्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोपपत्र दाखल करेपर्यत कणकवलीत येण्यास न्यायालयाने राणेंना बंदी घातली होती. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील दोषारोपपत्र आज कणकवली पोलिसांनी कणकवली न्यायालयात (Kankavali Court) दाखल केले आहे. तपास अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

घटनेच्या ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार हे आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या सह गोट्या सावंत, नितेश राणेंचे पीए राकेश परब यांचा कणकवली तालुक्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान शिवसेनेचे नेते संतोष परब हल्ला प्रकरण भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना चांगलेच भोवले होते. या प्रकरणी नितेश राणे यांचे सहकारी सचिन सातपुते यांना अटक झाली आहे. त्यानंतर आमदार नितेश राणे हे सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा होत्या. नितेश राणे अटकपुर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. परंतु त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. राज्य सरकार सुडबुद्धीने हे सर्व करत असल्याची टीकाही झाली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT